महावितरणचे स्वातंत्र्य दिनी ग्रामीण भागात सौर ग्राम दिन अभियान

बातमी शेअर करा...

महावितरणचे स्वातंत्र्य दिनी ग्रामीण भागात सौर ग्राम दिन अभियान

 

जळगाव : ग्रामीण भागातील वीजग्राहकांच्या जीवनात आमुलाग्र बदल करणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना आणि प्रधानमंत्री कुसुम योजनेची माहिती वीजग्राहकांना देण्यासाठी महावितरणचे अभियंता, कर्मचारी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने १५ ऑगस्ट २०२५ रोजी जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विविध ग्राम पंचायतीमध्ये ग्रामसभेत उपस्थित राहून सौर ग्राम दिनानिमीत्त वरील प्रमाणे माहीती देणार आहेत.

नुकताच राज्यात महावितरणने सौर ऊर्जा क्षेत्रात १००० मेगावॅट वीजनिर्मितीचा टप्पा गाठला आहे.

सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी लाभ घ्यावा, तसेच या योजनेत सहभागी झाल्यावर मिळणाऱ्या फायद्याची माहिती ग्रामीण भागातील वीजग्राहकांना देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोबतच यावेळी योजनेत सहभागी होण्यासाठी ग्राहकांचे अर्ज व आवश्यक कागदपत्रे घेऊन स्वीकारले जाणार आहेत. महावितरण जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी  यांच्यासह अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपविभागीय अधिकारी, शाखा अभियंता व कर्मचारी आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ग्राम पंचायतीच्या ग्राम सभेस उपस्थित राहून माहीती देतील.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम