
महावितरणच्या ५ लाखांच्या अॅल्युमिनियम तारा चोरी
महावितरणच्या ५ लाखांच्या अॅल्युमिनियम तारा चोरी
जळगाव : तालुक्यातील जळके ते वावडदा रोडवर महावितरण कंपनीच्या मालकीच्या १८ इलेक्ट्रिक पोलवरील सुमारे ५ हजार २०० मीटर लांबीची अॅल्युमिनियम तार (कंडक्टर) अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या तारेची अंदाजे किंमत ५ लाख रुपये असून, ही घटना ९ सप्टेंबर रोजी सकाळी समोर आली. अखेर गुरुवारी (दि. १८) सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सुधाकर येवले यांच्या शेताजवळून गुप्ता यांच्या रिसॉर्टपर्यंत ३३ के.व्ही. लाईनवरील १८ खांबांवरील तार चोरून नेण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी विजेच्या खांबावरून इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली ही चोरी पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.
या प्रकरणी वीज कंपनीसाठी कंत्राटी काम करणारे अनिस नसिम अहमद (वय ३२) यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोहेका किरण पाटील करत आहेत

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम