महावितरणमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा

बातमी शेअर करा...

महावितरणमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा

जळगाव : महावितरणच्या जळगाव परिमंडल कार्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी जळगाव मंडलाचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुख्य अभियंता मुलाणी यांनी महावितरणतर्फे ग्राहकांना सध्या देण्यात येणाऱ्या सवलती व विविध योजनांबाबत जनजागृती करण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना केले. यावेळी महावितरणच्या दिवंगत कर्मचाऱ्याच्या अवलंबितांना युनियन बँकेकडून देण्यात आलेल्या विमा निधीचा धनादेश मुख्य अभियंता मुलाणी यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यासाठी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर यांनी पाठपुरावा केला

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम