महावितरणसाठी आर्थिक शिस्तही महत्वाची
महावितरणच्या विविध घटकांशी साधला कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर यांनी संवाद
महावितरणसाठी आर्थिक शिस्तही महत्वाची
महावितरणच्या विविध घटकांशी साधला कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर यांनी संवाद
जळगांव I प्रतिनिधी
विद्युत वितरण क्षेत्रात सर्वोत्तम ग्राहक सेवा देण्यासाठी वीज गळती रोखण्या बरोबरच नियमित देयकांची वसुलीसुद्धा महत्वाची आहे. या कामात ग्राहकांच्या सहकार्याबरोबरच विद्युत कर्मचारी, अधिकारी, अभियंते, आणि महावितरणची विविध कामे करणाऱ्या गुत्तेदारांची जबाबदारीही महत्वपूर्ण आहे. असा संवाद महावितरणचे कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर यांनी दि.10 जानेवारी रोजी जळगाव येथे जनमित्र, तंत्रज्ञ, अभियंते आणि अधिकारी यांच्याशी विविध बैठका आणि सभातून साधला. कार्यकारी संचालकधनंजय औढेकर यांच्याकडे जळगाव परिमंडलाचे पालकत्व आहे. या पार्श्वभूमीवर श्री औंढेकर शुक्रवारी जळगाव परिमंडलाच्या दौऱ्यावर होते.
ग्राहकसेवा आणि महावितरणची आर्थिक शिस्त या संदर्भात निम्नस्तर ते वरिष्ठ स्तरावरील महावितरणच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. जनमित्र, तंत्रज्ञ, अभियंते आणि अधिकाऱ्यांची विस्तृत अशी भव्य सभासंत बाबा हरदासराम समाज मंदिर या सभागृहात झाली. या कार्यक्रमास जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी, अधिक्षक अभियंता अनिल महाजन, सहाय्यक महाव्यवस्थापक अशोक केदारे यांच्यासह जिल्ह्यातील महावितरणचे सर्व कार्यकारी अभियंते, उपकार्यकारी अभियंते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजेच्या क्षेत्रात सर्वोतम ग्राहक सेवा देण्यासाठी महावितरण कटीबध्द आहे. अपेक्षीत सेवा देण्यासाठी पायाभूत सुविधा उभारणे आवश्यक असते. त्यासाठी मोठा भांडवली खर्च करावा लागतो. या भांडवलाची गरज वापरलेल्या विजेच्या महसुलातूनच भागवली जाऊ शकते. त्यासाठी ग्राहकांनी वापरलेल्या विजेची बिले त्या-त्या महिन्यात देय तारखेच्या आत वसुल झालीच पाहिजेत. शिवाय ज्या भागात विजेची वितरण व वाणिज्यीक हाणी अधिक आहे. तेथे अनाधिकृत विज वापर थांबवून किंबहुना आवश्यक तेथे विज चोरीच्या कारवाया झाल्या पाहिजेत. असेही आवाहन श्री धनंजय औंढेकर यांनी केले.श्री संत बाबा हरदासराम समाज मंदिर या सभागृहात जनमित्र आणि तंत्रज्ञांची उपस्थिती लक्षनिय राहित्याने सभागृहात कर्मचाऱ्यांसाठी जागा आपुरी पडली.
महावितरण यंत्रणा आणि महावितरणची कामे करणाऱ्या कंत्राटदार एजन्सी यांच्यात योग्य समन्वय साधण्यासाठी संचालक श्री औंढेकर यांनी गुत्तेदारासोबत स्वतंत्र बैठक घेतली. अचूक विजमिटर रिडींग, बिल प्रिंटींग व विज बिलाचे वेळेत वितरण करण्यासंबंधीही सुचना त्यांनी या वेळी दिल्या. प्रधानमंत्री हर घर मुफ़्त बिजली योजना, सौर कृषी पंप योजना आदी कामालाही गती देण्याचे आवाहन त्यांनी केले. इतर विज विषयक कामसंबंधी ही दक्षपणाने काम करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.
ग्राहक सेवा आणि विजबिलाची वसुलीच्या कामात सामोहिकपणे कामगीरी करण्याच्या सुचनाही श्री धनंजय औंढेकर यांनी विविध विज कर्मचारी संघटनांच्या बैठकीत दिल्या.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम