
महावितरण जळगाव परिमंडलातील तांत्रिक वीज कर्मचाऱ्यांचा गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मान…
महावितरण जळगाव परिमंडलातील तांत्रिक वीज
कर्मचाऱ्यांचा गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मान…
जळगाव महावितरणच्या जळगाव परिमंडल कार्यालयात एक मे रोजी मुख्य अभियंता श्री आय.ए.मुलाणी यांच्या हस्ते ध्वजारोहणाने महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने महावितरणसाठी उत्कृष्ठ ग्राहकसेवा देणाऱ्या यंत्रचालक आणि तंत्रज्ञ संवर्गातील उत्कृष्ठ वीज कर्मचाऱ्यांचा मुख्य अभियंता यांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देवून गुणवंत कामगार म्हणून सत्कार करण्यात आला. यातील कर्मचाऱ्यांत जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
गुरुवारी सकाळी झालेल्या या समारंभास मुख्य अभियंता श्री आय.ए.मुलाणी यांच्यासह अधीक्षक अभियंता अनिल महाजन, मानव संसाधन विभागाचे सहाय्यक महाव्यवस्थापक अशोक केदारे व इतर सर्व अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुणवंत कामगार सन्मान समारंभात अध्यक्ष असलेले महावितरणचे मुख्य अभियंता श्री आय.ए.मुलाणी यांनी महावितरण परिवारातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांशी सुसंवाद साधून महावितरणची प्रतिमा सुधारणेस, ग्राहकसेवा प्राधान्य देणेचे मार्गदर्शन केले. या मध्ये महिला कर्मचाऱ्यांचा सुध्दा पुरस्कार देवून त्यांनी सन्मानीत केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात महावितरणचे कर्मचारी यांना “डिजिटल दूत” या पदवीने संबोधीत करत महावितरणमधील वीजबिल डिजिटल पध्दतीने वसुलीसह, इतरही कामे डिजीटल पध्दतीने करण्याचे आवाहन त्यांनी यावेळीस केले.
सन्मानित करण्यात आलेल्या यंत्रचालकांत जळगाव जिल्ह्यातून सर्व श्री विनायक सोनवणे, संजिव पाटील, सुरेश धनगर, अनिल पाटील, सुनिल पाचपांडे, विवेककुमार पाटील, संदिपकुमार बाविस्कर, श्रीमती मोनल मानिकजडे, धुळे जिल्ह्यातून दिलीप सोनवणे, राजेंद्र पवार, प्रविण राजपूत आणि नंदुरबार जिल्ह्यातून गुमान कोळी, मनोहर पावरा यांचा समावेश आहे.
तंञज्ञ व प्रधान तंञज्ञ संवर्गात जळगाव जिल्ह्यातून सर्व श्री ईश्वर कोळी, दशरथ सपकाळे, धनराज भंगाळे, दिवाकर आसने, रविंद्र माळी, अमोल पाटील, योगेश देशमुख, वसीम अली फकिर, सागर वाघ, प्रविण सोनवणे, प्रविण पाटील, दिलिप बागुल, योगेश कुरकुरे, किशोर पाटील, अधिकार राणे, आदिल देशमुख, विशाल काळे, मयुर पाटील, गोकुळ पाटील, दिलिप पाचपोले, गिरीष कापडे, किरण बागुल, भिका साळुंखे, ललित बोरसे, शरद गाजरे, कपिल राजपुत, गणेश माळी, अविनाश गोसावी, यशवंत अवचार, योगेश घोडेस्वार, श्रीमती पल्लवी शेवतकर, श्रीमती जयश्री पाटील, श्रीमती सुनिता सुर्यवंशी, धुळे जिल्ह्यातून स्वप्निल गिरासे, भिकुलाल सोनवणे, राकेश पवार, भुपेंद्र कोळी, संजय वळवी, सोनल बोसरे, रविंद्र साळुंखे, महेंद्र पारधी, डिगंबर उपाचार्या, महेंद्र पाडवी, उमाकांत बाविस्कर नंदूरबार जिल्ह्यातून रामदास पावरा, रविदास कोकणी, गणेश ठाकरे, अरविंद पाडवी, प्रविण बोरसे, दिपक पाथरवट, सुनिल वसावे, प्रकाश पावरा, अजय गिरनार यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे संचलन सहायक अभियंता श्रीमती रत्ना पाटील यांनी केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम