बातमीदार | दि ९ फेब्रुवारी २०२४
महाविद्यालय भेट – पंकज ग्लोबल पब्लिक स्कुल च्या विद्यार्थ्यांची गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयास भेट
विद्यार्थ्यांचा वैद्यकीय शिक्षणाकडे कल वाढावा यासाठी होती शैक्षणिक सहल
चोपडा – इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांची गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय साकेगाव, येथे नुकतीच भेट आयोजित करण्यात आली होती. सदरील भेटीचे उद्दीष्ट असे होते की,
विद्यार्थ्यांचा वैद्यकीय क्षेत्राकडे कल वाढावा, त्यांच्या शैक्षणिक अभ्यास क्रमात असलेल्या अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक ज्ञानात भर पडावी.
आजच्या अत्याधुनिक युगात जी आधुनिक सामग्री उपलब्ध आहे त्यांची माहिती व्हावी. सदरील शैक्षणिक सहलीचे नियोजन प्रमुख म्हणून इब्राहिम तडवी यांनी काम पाहीले.
गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने तेथील समन्वयक अशोक भिडे यांनी महाविद्यालयाचे इतर विभाग प्रमुखांच्या मदतीने संपूर्ण महाविद्यालयची पाहणी विद्यार्थ्यांना करुन दिली.
विद्यार्थ्यांनी तिथे आलेले डायलेसीस चे पेशंट व ईतर पेशंट सोबत चर्चा केली. शरीरातील सर्व अवयव कशा पद्धतीने कार्य करतात, याच्या बाबतीत बारकाईने विद्यार्थ्यांनी अभ्यास केला.
M.R.I. मशिन, C.T स्कॅन मशिन, X-Ray व इतर उपकरणांचा कशा पद्धतीने उपयोग होतो. प्रत्येक उपकरणांचे वैशिष्ट काय आहे ? व कुठले निदान करण्यासाठी कुठले उपकरण वापरावे ?
ह्या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना बारकाईने समजवून सांगण्यात आल्या.
रक्त पतपेढी कक्षा मध्ये देखील विद्यार्थ्यांना नेण्यात आले.
शरीरातील विविध रक्तगट, रक्ताचे कार्य व रक्ताचे घटक याबाबतीत विद्यार्थ्यांना सखोल ज्ञान देण्यात आले.
Also View Video Facbook👇
https://www.facebook.com/share/v/HAyXaGzKT7C4wjkk/?mibextid=2JQ9oc
सदरील सहल यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संचालक पंकज बोरोले, संस्थेचे उपाध्यक्ष अविनाश राणे यांचे मार्गदर्शन लाभले.
ह्या शैक्षणिक सहलीचे यशस्वीपणे आयोजन केल्याबद्दल संस्थेचे संस्था अध्यक्ष डाॅ सुरेश बोरोले यांनी अभिनंदन केले.
तसेच डॉ उल्हास पाटील, डाॅ केतकी पाटील यांचे विशेष आभार मानले, सहलीचे नियोजन प्राचार्य मिलिंद पाटील यांनी केले.
हे ही वाचा👇
उत्तीर्ण – रेखाकला परिक्षेत 39 विद्यार्थी उत्तीर्ण
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम