
महावृक्षारोपण उपक्रमात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती
महावृक्षारोपण उपक्रमात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती
भुसावळ : चोरवड (ता. भुसावळ) येथे युवा कार्यक्रम आणि
क्रीडा मंत्रालय, जिल्हा प्रशासन जळगाव व ‘मेरा युवा भारत’ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक पेड माँ के नाम २.० या महावृक्षारोपण उपक्रमाला आज भव्य प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, भाजपाचे पदाधिकारी, मेरा युवा भारतचे प्रतिनिधी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, विद्यार्थी, स्थानिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम