महाशिवरात्रीनिमित्त शिवधाम मंदिर  येथे  भव्य सजीव 

बातमी शेअर करा...

महाशिवरात्रीनिमित्त शिवधाम मंदिर  येथे  भव्य सजीव 

महाअभिषेक,साबुदाणा खिचडी सेवा,आरोग्य व रक्तदान शिबिरासह अन्य उपक्रम 

जळगांव – शहरातील निमखेदी परिसरातील शिवधाम चॅरिटेबल ट्रस्ट,राधे नगर शिवधाम मंदिरात
महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन सालाबाद प्रमाणे दि 26 फेब्रुवारी 2025, बुधवार रोजी करण्यात येत असून भव्य धार्मिक, आध्यात्मिक उपक्रमांसह भाविक भक्तांसाठी यंदा भव्य सजीव आरास,इंदोरी लायटिंग सजावट,विशेष दुग्ध महाअभिषेक,साबुदाणा खिचडी सेवा,आरोग्य व रक्तदान शिबिरासह बहुविध उपक्रम दिवसभर आयोजन केले आहेत.

या पवित्र दिवशी पहाटे ४ वाजता १२ ज्योतिर्लिंगांचे १०१ लिटर दूधाने अभिषेक करून विशेष पूजा होईल. भाविकांसाठी १००० लिटर मिल्कशेकचे वाटप, तसेच भव्य,अप्रतिम लाइटिंग शो, आणि आकर्षक आतिशबाजी प्रकाशमय शो आयोजित करण्यात आला आहे.
बालगोपाळांसाठी आनंद मेळा, मोफत आरोग्य तपासणी शिबिर,रक्तदान शिबिर भक्तांसाठी राधा-कृष्ण भजन संध्या, तसेच पूर्ण दिवस साबुदाणा खिचडी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.सामजिक सेवाभावी संस्था मुक्ती फाउंडेशन व आरएल.मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे,इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या सहकार्याने
रक्तदान व विविध आरोग्य शिबिरांचा विशेष उपक्रमही यावेळी
संस्थेतर्फे राबविण्यात येणार आहे.
महादेवाच्या कृपाशीर्वादाने आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर करण्यासाठी संपूर्ण कुटुंबासह या पवित्र महोत्सवात सहभागी व्हा आणि या दिव्य सोहळ्याचा लाभ घ्या असे आवाहन शिवधाम चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम