
महाशिवरात्री निमित्त शेगावमध्ये चार दिवसीय निःशुल्क आवासीय पिरॅमिड ध्यान शिबिर
चार हजाराहुन अधिक साधकांची राहणार उपस्थिती
महाशिवरात्री निमित्त शेगावमध्ये चार दिवसीय निःशुल्क आवासीय पिरॅमिड ध्यान शिबिर
चार हजाराहुन अधिक साधकांची राहणार उपस्थिती
शेगाव / प्रतिनिधी
महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटी मूव्हमेंट महाराष्ट्र यांच्या वतीने श्री संत गजानन महाराजांच्या नगरी शेगाव येथे चार दिवसीय निःशुल्क आवासीय पिरॅमिड ध्यान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. है शिबिर २५ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान शिवांश सेलिब्रेशन हॉल, श्री गजानन महाराज इंजिनिअरिंग कॉलेज जवळ, खामगाव रोड, शेगाव येथे पार पड़णार आहे.
शिबिराचा उद्घाटन समारंभ २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५:०० वाजता संपन्न होणार आहे. यावेळी नांदुरा मलकापूर मतदारसंघाचे आमदार मा. श्री चैनसुखदाजी संचेती आणि महाराष्ट्र भूषण संस्कार महर्षी आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या शिबिरात संपूर्ण भारतातून साधक सहभागी होणार असून, ३ ते ४ हजाराहून अधिक साधकांची उपस्थिती अपेक्षित आहे. ध्यानाच्या माध्यमातून मानसिक शांतता, उत्तम आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नती साधण्याची सुवर्णसंधी साधकांना मिळणार आहे.
शिबिरात दररोज सकाळी ५:०० वाजता ध्यान सत्राची सुरुवात होईल. याशिवाय विविध ज्ञानसत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच सामूहिक ध्यान सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. सर्व सहभागीसाठी निःशुल्क चहा-पाणी आणि भोजन प्रसाद याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी, श्री गजानन महाराज संस्थानच्या पावन ऊर्जा केंद्रात ध्यान व अध्यात्माचा त्रिवेणी संगम घडविणारे हे शिबिर पिरॅमिड मेडिटेशन टीव्ही चॅनलवरून थेट प्रक्षेपित केले जाणार आहे.
या शिबिरासाठी परिणीता पत्री, वसंथा शास्त्री, ध्यानरत्न रामा राजू, श्रेयांश डागा, शंपा मुखर्जी, सारिका सराफ, ब्रह्मश्री श्रीकाल जोशी, ब्रहमश्री श्रीकांत कुलकर्णी, ब्रह्मश्री प्रेमनाथ, महेशजी अग्रवाल, रामू मास्टर, रचना गुप्ता, रागिनी सेल्वराज, महेश्वरीजी, मास्टर पल्लवी यांसारखे अनेक नामवत वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.
लहान मुलांसाठी विशेष कार्यक्रमांची आखणी करण्यात आली असून, ध्यान सत्रे, संस्कार वर्ग, तसेच सांस्कृतिक आणि मनोरंजन कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात आले आहे.
ध्यान हे फक्त मानसिक शांततेसाठीच नव्हे तर शरीर, मन आणि आत्मा यांच्यातील संतुलन साधण्याचा प्रभावी मार्ग आहे. ध्यानामुळे तणाव कमी होतो, एकाग्रता वाढते, सकारात्मक विचारसरणी विकसित होते आणि उत्तम आरोग्य टिकविण्यास मदत होते. नियमित ध्यानामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो, निद्रानाश दूर होतो आणि मनाची स्थैर्यता प्राप्त होते. आजच्या धावपळीच्या युगात ध्यान हे मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी एक वरदान ठरत आहे.
पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटी देशभरात आणि विदेशात निशुल्क ध्यान शिबिरे आयोजित करून लाखो लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवत आहे. पिरॅमिड मेडिटेशन टीव्ही चॅनलद्वारे ध्यानाचे घंट प्रक्षेपण करून अनेक लोकांना याचा लाभमिळवून देण्यात येतो.
हा शिबीर यशस्वी करण्यासाठी नांदुरा, चिखली, वाशिम, कारंजा, बुलढाणा, सोलापूर, वह इतर महाराष्ट्रातील पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटीच्या लाईट वर्कर्सनी या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले आहे.
“ध्यान करा, जीवन बदला।” या पवित्र ध्येयाने कार्यरत असलेल्या पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटी मूव्हमेंटच्या वतीने सर्व साधकांना या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या शिबिरासंदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेला सौ. देवयानीताई नवगजे (नांदुरा), रुपेश लड्ढा (वाशिम), चंद्रकांता ताई जाधव (चिखली) आणि शुभांगी कुटे ताई (चिखली) उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम