
महिलांची होणार वर्षभर मोफत आरोग्य तपासणी
रोटरी,इनरव्हील आणि गुजराथी महिला मंडळातर्फे आयोजन
महिलांची होणार वर्षभर मोफत आरोग्य तपासणी
रोटरी,इनरव्हील आणि गुजराथी महिला मंडळातर्फे आयोजन
जळगाव प्रतिनिधी
येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन, इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्ट, गुजराथी समाज महिला मंडळ आणि इनरव्हील क्लब जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षभर महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
रिंगरोडवरील जेडीसीसी बँकेच्या बाजूला असलेल्या डॉ. सुमन लोढा यांच्या हॉस्पिटल मध्ये वर्षभर प्रत्येक मंगळवारी दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळेत महिलांची ही मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
महिलांनी आरोग्य विषयी जागरूक राहावे म्हणून श्री.स्वामी समर्थ ग्रुपच्या संचालिका व मुख्याध्यापिका स्व.सौ. प्रतीक्षा पाटील यांच्या स्मरणार्थ हा उपक्रम राबविला जात आहे.
गरजू महिलांनी या उपक्रमाचा फायदा घ्यावा असे अध्यक्ष छाया पाटील, ज्योती पाटील, भावना चव्हाण, रंजन पटेल, किरण सिंग, शीतल शाह, प्रीती जोशी यांनी आवाहन केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम