महिलांच्या वर्षभर मोफत आरोग्य तपासणीचा शुभारंभ

रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन, इनरव्हील क्लब , गुजराथी समाज महिला मंडळचा उपक्रम

बातमी शेअर करा...

महिलांच्या वर्षभर मोफत आरोग्य तपासणीचा शुभारंभ
रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन, इनरव्हील क्लब , गुजराथी समाज महिला मंडळचा उपक्रम
जळगाव – येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन, इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्ट, गुजराथी समाज महिला मंडळ व इनरव्हील क्लब जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षभर महिलांची मोफत आरोग्य तपासणी उपक्रमाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला.
रिंगरोड वरील जेडीसीसी बँकेच्या बाजूला असलेल्या डॉ. सुमन लोढा यांच्या हॉस्पिटलमध्ये झालेल्या कार्यक्रमास जळगाव पीपल्स बँकेचे माजी चेअरमन भालचंद्र पाटील, माजी महापौर सीमा भोळे, डॉ. सुमन लोढा यांची प्रमुख उपस्थिती होती.
वर्षभर प्रत्येक मंगळवारी दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळेत स्व.प्रतीक्षा पाटील यांच्या स्मरणार्थ महिलांची मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी भालचंद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले तर सीमा भोळे यांनी गरजू महिलांच्या शस्त्रक्रियेसाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
यशस्वीतेसाठी छाया पाटील, भावना चव्हाण, रंजन पटेल, किरण सिंह, शितल शाह, प्रीती जोशी, हर्षाली पाटील, वैशाली धांडे, वैशाली शिंदे, तनुजा मोती यांनी परिश्रम घेतले .

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम