
महिलांनी ऑनलाईन फसवणुकी पासुन सावध राहावे- मिनल करनवाल
महिलांनी ऑनलाईन फसवणुकी पासुन सावध राहावे- मिनल करनवाल
जळगाव प्रतिनिधी उमेद अंतर्गत महिला बचत गटांसाठी ऑनलाईन सतर्कता पंधरवाडा राबवण्याचा अभिनव उपक्रम श्रीमती मीनल करणवाल यांनी हाती घेतला असून त्याची सुरुवात जामनेर तालुक्यातील उमेद अभियानातील कार्यरत महिला बचत गटांच्या समुदाय संसाधन व्यक्ती यांच्याशी ऑनलाइन संवाद साधून आज करण्यात आला .
उमेद अभियानाचे जिल्ह्यातील 2250 कार्यरत समुदाय संसाधन व्यक्ती अर्थात सीआरपी कार्यरत आहेत . जिल्ह्यात एकूण 67 प्रभाग संघ असून 1430 ग्राम संघातील एकूण 33000 स्वयंसहायता समूह सक्रिय आहेत . एका स्वयंसहाय्यता समूहामध्ये 10 महिला असे एकूण तीन लाख तीस हजार महिला जिल्ह्यात स्वयंसहायता समूहांमध्ये समाविष्ट आहेत. महिलांमध्ये ऑनलाइन फसवणुकीचे विविध प्रकार घडत असतात. त्यासंबंधी जाणीव जागृती होण्यासाठी जिल्हा परिषद जळगाव व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जळगाव यांच्या मार्गदर्शनाने महिलांमध्ये ऑनलाइन फ्रॉड व फसवणूक होऊ नये यासाठी सतर्कता पंधरवाडा राबविण्यात येत आहे .
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्ह्यातील कार्यरत महिला केडर सर्व समुदाय संसाधन व्यक्ती यांचे ऑनलाइन कार्यशाळा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव श्रीमती मीनल करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर तालुक्यातील सर्व केडर यांची कार्यशाळा घेण्यात आली . सदरील कार्यशाळेमध्ये महिलांनी ऑनलाइन फसवणुकीपासून सुरक्षित रहावे व सतर्क रहावे . तसेच कुठल्याही अनोळखी व्यक्ती यांनी पाठवलेले मेसेज ,लिंक याला प्रतिसाद देऊ नये , मोबाईल वापरताना काळजीपूर्वक वापरावा आपल्या मोबाईल मध्ये आलेले पासवर्ड कोणालाही शेअर करू नये तसेच आर्थिक व्यवहार करताना सांभाळून करावेत . कुठल्याही एसएमएस ऑनलाइन लिंक याबाबत तात्काळ प्रतिसाद देऊ नये त्याची शहानिशा करून समजदार व जाणकार व्यक्तीकडून त्याबाबत खात्री झाल्यावरच त्याबाबत प्रतिसाद द्यावा . कोणत्याही अमिषाला बळी न पडता आपले बँकिंग व्यवहार सांभाळून करावेत याबाबत मीनल करणवाल यांनी मार्गदर्शन केले. सदरील ऑनलाइन कार्यशाळेसाठी प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा श्री राजू लोखंडे . लीड डिस्ट्रिक्ट बँक मॅनेजर सुनील कुमार दोहरे .जिल्हा अभियान व्यवस्थापक हरेश्वर भोई . व तालुका अभियान व्यवस्थापक सर्व टीम ऑनलाईन हजर होते

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम