महिलांनी, विद्यार्थांनी आपले आरोग्याकडे लक्ष द्यावे – डॉ. सुमन लोढा

आयएमआर’ मध्ये युवती सभेचे आयोजन

बातमी शेअर करा...

महिलांनी, विद्यार्थांनी आपले आरोग्याकडे लक्ष द्यावे – डॉ. सुमन लोढा

आयएमआर’ मध्ये युवती सभेचे आयोजन

जळगाव प्रतिनिधी

केसीई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमध्ये ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून युवती सभेचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी, विद्यार्थांनी आपले आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे, त्यांनी स्व:ताची काळजी घेतली पाहिजे हे उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेवून या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुमन लोढा यांना बोलविण्यात आले. त्याचे स्वागत प्रा. बी.व्ही. पवार सर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. यामिनी भाटीया यांनी केले. महिलांचे आरोग्य याविषयावर बोलतांना डॉ. सुमन लोढा यांनी विद्यार्थिनीशी हितगुज केले, ‘हेल्थ इज वेल्थ’किंवा ‘हेल्थ इज एव्हरीथिंग’ या उक्तीनुसार त्यांनी आपणच आपली काळजी कशी घ्यावी, तसेच आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी महत्वाच्या टिप्स सांगितल्या. आजच्या धावपळीच्या काळात शारीरिक, मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, त्यासाठी डाएट, लाईफ स्टाईल, ड्रेसिंग यावर लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या दैनदिन जीवनशैली मध्ये व्यायाम, मेडीटेशन या सवयी आत्मसात करणे, जेवणामध्ये सर्वप्रकारच्या हिरवे पालेभाज्या, गाजर, बीट यांचा समावेश करणे तसेच मैदा, किंवा बंद पॅकेटमधील पदार्थ, जंक फूड ही टाळणे आवश्यक आहे. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये महिलांना व मुलींना रक्ताची कमतरता, व्हिटामिन ‘ड’ ची मोठ्याप्रमाणात कमतरता, थॅायराइड, वजन वाढणे अश्याप्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते, त्यासाठी महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, त्यांनी मुलींना आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने अनेक मार्ग सांगितले.
याप्रसंगी आयएमआर चे संचालक प्रा. बी.व्ही.पवार यांनी मुलींना आरोग्यविषयी काळजी घेण्याचे आव्हान केले, त्यांनी मुलींना चांगल्या सवयी आत्मसात करव्यात, सकाळी लकवर उठून पायी फिरणे, मेडीटेशन करणे याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयातील महिला कर्मचारी यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला, यामध्ये डॉ. वर्षा पाठक, डॉ. धनश्री चौधरी, डॉ. दिपाली पाटील, रुपाली नारखेडे, भावना जावळे यांना त्याचं मिळालेल्या यशाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रा. यामिनी भाटीया यांनी मानले. कार्यक्रमास डॉ. दिपाली पाटील, डॉ. धनश्री चौधरी, डॉ. कविता पवार, रुपाली नारखेडे, भावना जावळे आदींची उपस्थिती लाभली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम