
महिला डॉक्टरशी गैरवर्तन करणारे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. घोलप अटकेत
महिला डॉक्टरशी गैरवर्तन करणारे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. घोलप अटकेत
जळगाव (प्रतिनिधी): महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांना सहकारी महिला डॉक्टरशी गैरवर्तन आणि शरीरसुखाची मागणी केल्याच्या गंभीर आरोपांनंतर रविवारी (दि. २१ सप्टेंबर) शहर पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे महापालिका तसेच वैद्यकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
३८ वर्षीय महिला डॉक्टरने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, शाहू महाराज रुग्णालयातील प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षात कर्तव्यावर असताना डॉ. घोलप यांनी घाणेरडे इशारे केले, मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आणि तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसुखाची मागणी केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी डॉ. घोलप यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. त्यांच्या कारकिर्दीत यापूर्वीही अनेक तक्रारी नोंद झाल्या होत्या. जन्म-मृत्यू नोंदणी विभागात त्यांनी केलेल्या गैरप्रकारांची चौकशी सुरू होती. मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेत नियुक्त झालेल्या महिलेच्या जागी तिचा पती काम करत असल्याचा प्रकार उघड झाल्यानंतरही त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
विशाखा समितीच्या प्राथमिक अहवालासह अनेक तक्रारींचा गांभीर्याने विचार करून अखेर आयुक्तांनी त्यांना दोषी ठरवले आणि निलंबनाचे आदेश जारी केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम