महिला दिनानिमित्त कष्टकरी पालक महिलांचा सन्मान

नूतन मराठा महाविद्यालयात झाला कार्यक्रम

बातमी शेअर करा...

महिला दिनानिमित्त कष्टकरी पालक महिलांचा सन्मान

नूतन मराठा महाविद्यालयात झाला कार्यक्रम

जळगाव प्रतिनिधी

जागतिक महिला दिनानिमित्त नूतन मराठा महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल पी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कष्टकरी, कामगार, पालक महिलांना शाल, सन्मानचिन्ह आणि बुके देऊन सन्मानित करण्यात आले.

आपल्या मनोगतात डॉ एल पी देशमुख यांनी
समाजातील तळागाळातील कष्टकरी महिला, ज्या शाळेत व्हॅन चालवून, पेट्रोल पंपावर काम करत ,दुध डेअरी चालवत,धुनंभांडी, घरकाम, सफाई काम, शिवणकाम अशा वेगवेगळे आव्हानात्मक काम करत आपला उदरनिर्वाह चालवत मुलांच्या शिक्षणासाठी अहोरात्र कष्ट आणि मेहनत घेतात त्या महिलांचा सन्मान झाला पाहिजे,
जशा सामाजिक, राजकीय सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला आहेत त्याच तोडीचे स्थान या सामान्य महिलांना देखील आपल्या असामान्य कामगिरीने प्राप्त होते म्हणून त्यांचा सत्कार झाला पाहिजे या उद्देशाने हा सन्मान घडवून आणला असे सांगितले..

संगीता चौधरी, वैशाली वाणी, आशा सुरवाडे यांना आपले अनुभव सांगताना व सत्काराला उत्तर देताना गहिवरून आले..

कार्यक्रमाच्या अध्यक्ष वैशाली वाणी यांच्यासह सरला महाजन, सुरेखा शिरसाठ, संगीता चौधरी, कविता सोलंकी, शुभांगी भांडारकर, आशा सुरवाडे, संगीता पवार, मीना माळी, मनिषा माळी, मुक्ता जाधव, गीता वाघ, सुमन चांगरे, कल्पना पाटील इ मान्यवर महिलांचा सन्मान करण्यात आला..

दरम्यान महिला दिनाचे औचित्य साधून नुकत्याच शहादा येथे पार पडलेल्या विभागीय साॅफ्टबाॅल स्पर्धेत विजेतेपद मिळविणाऱ्या दुहिता पाटील,साक्षी पाटील, दिपाली सुरवाडे, प्रियंका सैनी,अनुश्री कोळी या मुलींचे प्राचार्य साहेबांच्या हस्ते पुष्य देवून स्वागत करण्यात आले

सुत्रसंचलन प्रा रत्नाकर कोळी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा घनश्याम पाटील यांनी केले.छ
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल पी देशमुख, उपप्राचार्या डॉ एम एस पाटील, उपप्राचार्य डॉ के बी पाटील, उपप्राचार्य प्रा संजय पाटील, डॉ इंदिरा पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक प्राध्यापिका आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम