
महिला दिवसाच्या निमित्ताने मिळणार पळाशी येथील पदवीधर शिक्षका निलीमा माळी यांना कर्तुत्ववान महिला पुरस्कार
विविध सामाजिक उपक्रमासह निशुल्क स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका...
महिला दिवसाच्या निमित्ताने मिळणार पळाशी येथील पदवीधर शिक्षका निलीमा माळी यांना कर्तुत्ववान महिला पुरस्कार
विविध सामाजिक उपक्रमासह निशुल्क स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका
सोयगाव प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळाशी केंद्र बनोटी येथील पदवीधर शिक्षिका निलीमा नितीनकुमार माळी. यांना नुकताच मातृसेवा फाउंडेशन ठाणे आणि शिक्षक ध्येय मासिक यांच्या संयुक्त विद्यमाने 2025 या वर्षाचा कर्तृत्वान महिला पुरस्कार हा जागतिक महिला दिवस 8 मार्च रोजी प्रदान करण्यात येणार आहे. निलिमा माळी या गेल्या 15 वर्षापासून सामाजिक सेवेत कार्यरत आहेत. त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर या तालुक्यात योग आणि नॅचरोपॅथीचा प्रचार आणि प्रसार ग्रामीण तसेच आदिवासी भागात केलेला आहे. कोरोना सारख्या प्रतिकूल काळात देखील त्यांनी 5000 मोफत जलनेतीची पात्र वाटून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक गल्लोगल्ली केलेले होते. त्याचप्रमाणे विधवा महिलांसाठी पुस्तक रुपी गिफ्ट देऊन हळदीकुंकवाचा कार्यक्रम संपन्न केला होता. तसेच महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेच्या माध्यमातून इयत्ता दुसरी ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना निशुल्क मार्गदर्शन करणे, विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून शाहू,फुले,आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, यासारख्या विषयांवर विविध ठिकाणी व्याख्यानाचे सादरीकरण करणे तसेच महिलांसंदर्भात मासिक पाळी आणि शरीराची काळजी, मानसिक आणि शारीरिक आरोग्य सांभाळताना, आनंदी जीवनाचे मूल रहस्य या यासारख्या विविध विषयावर वेगवेगळ्या गटातील महिलांना उदबोधित केलेले आहे. गेल्या 01 वर्षापासून छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यातील पळाशी या अवघड क्षेत्रात अध्यापनाचे व विविध उपक्रम राबवण्याचे प्रामाणिकपणे कार्य करीत असून या ठिकाणी देखील त्यांनी महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेच्या विद्यार्थ्यांना वर्षभर निशुल्क मार्गदर्शन केलेले आहेत.या सर्व प्रामाणिक कार्याचा आणि सेवेचा आढावा घेता त्यांना 2025 या वर्षाचा कर्तृत्ववान महिला पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे नुकतेच शिक्षक ध्येय या मासिकाचे संपादक मधुकर घायधार, मातृसेवा फाउंडेशनच्या संचालिका संध्या सावंत, मंगल यश शैक्षणिक संस्था हिंगणघाट वर्धा या संस्थेचे संचालक दिपाली दीक्षित , मुंबईचे विलास व्हटकर यांनी कळविले आहे. निलीमा माळी या उत्तम लेखिका असून त्यांचे आरोग्य, औद्योगिक भूगोल, साधन संपदा भूगोल,योग आणि शारीरिक शिक्षण,निसर्गोपचार, वैदिक गणित या विषयावर पाच पुस्तकांचे लिखाण पूर्ण झालेले आहे. त्यांची जळगाव विद्यापीठात मानसशास्त्र या विषयात पीएचडी अंतिम टप्यात सुरू आहे. या घवघवीत यशाबद्दल सर्व शैक्षणिक परिसरातून जिल्हा शिक्षण अधिकारी जयश्री चव्हाण, गटशिक्षणाधिकारी श्री आढाव साहेब, नवापूर येथील शिक्षण विस्तार अधिकारी किशोर रायते,शाळेचे मुख्याध्यापक अरुण पाटील, केंद्रप्रमुख नितीन राजपूत, परिसरातील शिक्षक वृंद तसेच बालगोपाल विद्यार्थी यांच्याकडून कौतुक होत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम