
महिला पोलिसांची जळगाव शहरातून ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ जनजागृतीसाठी मोटरसायकल रॅली
शिक्षण आणि महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश देत उत्साहात रॅली
महिला पोलिसांची जल्गाव शहरातून ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ जनजागृतीसाठी मोटरसायकल रॅली
शिक्षण आणि महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश देत उत्साहात रॅली
जळगाव (प्रतिनिधी) : ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जळगाव जिल्हा पोलीस दलातील ७५ महिला अधिकारी आणि कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहात मोटरसायकल रॅली काढून समाजात जनजागृतीचा संदेश दिला.
ही भव्य मोटरसायकल रॅली जिल्हा पोलीस मुख्यालयातून अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरू करण्यात आली. महिलांच्या सशक्तीकरणासह शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रॅलीने शहरातील महत्त्वाच्या चौकांमधून मार्गक्रमण करत जिल्हा पोलीस मुख्यालयात पुनश्च परतली. कोर्ट चौक, जुने बसस्थानक, अजिंठा चौफुली, आकाशवाणी चौक आणि स्वातंत्र्य चौक या भागांतून गेलेल्या या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश देणारे फलक महिला पोलिसांच्या हातात होते. नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करून पोलीस दलाच्या महिलांना प्रोत्साहन दिले.
या वेळी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, रामानंद पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल भवारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक बबन आव्हाड, राज्य राखीव दलाचे पोलीस निरीक्षक प्रशांत सुगरवार यांच्यासह मोठ्या संख्येने महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होत्या. या अनोख्या उपक्रमातून ‘बेटी बचाव, बेटी पढाव’चा महत्त्वपूर्ण संदेश समाजात पोहोचवण्याचा प्रयत्न पोलीस दलाच्या महिला अधिकाऱ्यांनी केला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम