महिला सक्षमीकरण आणि प्रशासन सुधारणा – ‘१०० दिवस कार्यक्रमांतर्गत’ विशेष उपक्रम

जिल्ह्यात जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

बातमी शेअर करा...

महिला सक्षमीकरण आणि प्रशासन सुधारणा – ‘१०० दिवस कार्यक्रमांतर्गत’ विशेष उपक्रम

जिल्ह्यात जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

 

जळगाव प्रतिनिधी

राज्य सरकारच्या ‘100 दिवस कार्यक्रम’ अंतर्गत जळगाव जिल्ह्यात जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या ई-ऑफिस प्रशिक्षण कार्यशाळेत निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, जिल्हा सूचना-विज्ञान अधिकारी महेश पत्की आणि प्रकल्प संचालक जितेंद्र कोळी यांची उपस्थिती होती.

या प्रशिक्षणात ई-ऑफिस प्रणालीचा प्रभावी वापर, प्रशासकीय प्रक्रियेत डिजिटल प्रणालीच्या उपयोगावर सादरीकरण आणि प्रत्यक्ष ऑनलाईन कामकाजाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ई-ऑफिस प्रणाली अधिक सुलभ करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमामुळे महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना डिजिटल प्रशासनाच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या असून, प्रशासन अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी हा प्रयत्न महत्त्वाचा ठरत आहे. जिल्ह्यातील सर्व महिलांनी आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम