माजी आमदार अरुण पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

बातमी शेअर करा...

माजी आमदार अरुण पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

रावेर प्रतिनिधी Iरावेर तालुक्याचे माजी आमदार अरुण पाटील यांनी अखेर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीपासून त्यांच्या प्रवेशाची चर्चा होती, ती आता खरी ठरली. दि. ९ सप्टेंबर रोजी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन आणि आमदार अमोल जावळे यांच्या उपस्थितीत अरुण पाटील यांनी त्यांचा पुतण्या मंदार पाटील यांच्यासह औपचारिक प्रवेश केला.

अरुण पाटील यांचा भाजपशी जुना संबंध आहे. भाजपमधूनच ते दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र २००९ मध्ये पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)मध्ये प्रवेश केला होता.

मुक्ताईनगर मतदारसंघातील धामोडी हे त्यांचे मूळ गाव असून, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली होती. त्या वेळी या मतदारसंघात शिवसेनेचे आ. चंद्रकांत पाटील, भाजपच्या रोहिणी खडसे आणि राष्ट्रवादीचे अरुण पाटील अशी तिरंगी लढत झाली होती. मात्र अपेक्षेपेक्षा त्यांना अल्प मते मिळाली आणि पराभव पत्करावा लागला होता.

आता त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात होण्याची चिन्हे दिसत आहेत

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम