माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

लॉयन्स अन्नछत्र येथे गरजुंना भोजन वाटप व सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळवाटप

बातमी शेअर करा...

माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

लॉयन्स अन्नछत्र येथे गरजुंना भोजन वाटप व सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळवाटप

खामगाव प्रतिनिधी

खामगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांचा वाढदिवस 1 मे 2025 रोजी सानंदा परिवाराच्या वतीने लॉयन्स क्लब खामगाव द्वारा संचालक लॉयन्स अन्नछत्र येथे माजी नगराध्यक्षा सौ.अलकादेवी सानंदा व राणा दिग्वीजयसिंह सानंदा यांच्या हस्ते गरजुंना भोजन वाटप करण्यात आले. यावेळी लॉयन्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.तद्नंतर सायंकाळी 5 वाजता खामगाव महिला काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेसच्या वतीने माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या वाढदिवसानिमित्त सामान्य रुग्णालय येथे रुग्णांना फळफ्रुट व बिस्कीटांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी रुग्णांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपुस केली.या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्षा सौ.अलकादेवी सानंदा, खामगाव शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने,खामगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज वानखडे,शेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय काटोले,महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्षा सौ.सुरजितकौर सलुजा,महिला संघटक सौ.वर्षाताई इंगोले, बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे,संचालक संजय झुनझुनवाला,युवक काँग्रेसचे तुषार चंदेल,विदर्भ हौशी कबडड्ी असो.चे सचिव अशोकबाप्पु देशमुख,भारतीय बौध्द महासभेचे शहरअध्यक्ष दादाराव हेलोडे,अन्सार भाई,तहेसीन शाह,मुकदद्र खान,शेख इम्रान यांच्यासह महिला काँग्रेस व युवक काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम