माजी नगराध्यक्ष गणेश परदेशी यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश

बातमी शेअर करा...

माजी नगराध्यक्ष गणेश परदेशी यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश
भडगाव (प्रतिनिधी): भडगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख प्रवक्ते गणेश परदेशी यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. या प्रवेशाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या दृष्टीने हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे.परदेशी यांनी ठाकरे गट सोडून आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात प्रवेश केला. या सोहळ्यास आमदार किशोर पाटील, उपजिल्हाप्रमुख डॉ. विशाल पाटील, समन्वय समितीचे अध्यक्ष युवराज पाटील, युवासेनेचे जिल्हाप्रमुख लखीचंद पाटील, माजी नगरसेवक डॉ. प्रमोद पाटील, निलेश पाटील, देवा अहीरे, जगन भोई, बापूराव पाटील, महेंद्र ततार, रविंद्र पाटील, प्रदीप मालचे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.गणेश परदेशी यांच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाची राजकीय ताकद कमी झाल्याची चर्चा आहे. त्यांचे समर्थकही लवकरच शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे. यामुळे भडगाव नगरपरिषद निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम