
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना बंधुशोक
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना बंधुशोक
रत्नागिरी प्रतिनिधी I माजी महसूल मंत्री व आमदार एकनाथराव खडसे यांचे जेष्ठ बंधू डॉ.बारसु गणपतराव खडसे (कोथळी) (85) यांचे गुरुवार, 25 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 मिनिटांनी दापोली, जि.रत्नागिरी येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार दापोली होमोपॅथीक वैद्यकीय महाविद्यालात देहदान करण्यात येणार आहे.
ते मुंबई व परिसर लेवा मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष तथा हाफकिन इन्स्टिट्यूट परेल या संस्थेचे माजी संचालक होत. ते एक समर्पित शास्त्रज्ञ देखील होते. त्यांचे कार्य अनेकांच्या जीवनाला स्पर्शून गेले. त्यांचे प्राथमिक माध्यमिक शिक्षण मुक्ताईनगर, जि.जळगाव येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण छत्रपती संभाजीनगरात झाले. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी प्राप्त केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम