
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या जळगावातील घरी घरफोडी
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या जळगावातील घरी घरफोडी
लाखोंचा ऐवज लंपास ; शहरात खळबळ
जळगाव | प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या ‘मुक्ताई’ या निवासस्थानी चोरटयांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून घरांमधी सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड असा लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. या घरफोडीमुळे शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल आकर्णयाचे काम सुरु होते. दरम्यान एकनाथराव खडसे यांच्या स्नुषा केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या मुक्ताईनगरमधील पेट्रोक पंपावर दरोडा पडल्याची घटना ताजी असतांना हि घरफोडीच्या घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचीन निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवरामनगर परिसरातील ‘मुक्ताई’ बंगला दिवाळीच्या सुटीनिमित्त बंद होता. माजी मंत्री एकनाथराव खडसे हे या काळात मुक्ताईनगर येथील निवासस्थानी वास्तव्यास होते. मंगळवारी सकाळी त्यांचे सहकारी नेहमीप्रमाणे बंगल्यावर पोहोचले असता, त्यांना मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश करून पाहणी केली असता, घरातील सर्व सामान विखुरलेल्या अवस्थेत आढळले, ज्यामुळे चोरी झाल्याची खात्री पटली.
या घटनेची माहिती मिळताच खडसे यांनी तात्काळ स्थानिक पोलिसांना कळविले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन काही मिनिटांतच पोलिस अधिकारी आणि गुन्हे शोध पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम वेगाने सुरू आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या घरामधून गहू पोत २० ग्रॅम,सोन्याचे कानातील ४ ग्राम, कानातील ३ग्रॅम, डायमंड कर्णफुल ४ ग्राम, दोन अंगठ्या प्रत्येकी तीन आणि चार ग्रॅम असे एकूण ७ग्रॅम, गोफ दहा ग्रॅम, चांदी ब्रेसलेट चा भार, आमदार खडसे यांच्या पहिल्या मजला वरील बेडरूम मधून प्रत्येकी पाच ग्रॅम वजनाच्या चार अंगठ्या अशा एकूण वीस ग्रॅम अंगठ्या, ३५ हजार रुपयांची रोकड, भेटवस्तू मिळालेल्या वस्तूंमध्ये चांदीची एक किलो गदा, एक किलो वजनाचा चांदीचा त्रिशूल, चांदीचे सहा ग्लास एक किलो २०० ग्रॅम, चांदीची तलवार दोन किलो वजनाची, तसेच दोन चांदीचे मोठे रथ अंदाजे दोन ते अडीच किलो वजनाचे असा एकूण सुमारे लाखोंचा ऐवज चोरी गेला आहे.
माजी मंत्र्यांच्या घरावरच चोरीचा हात साफ झाल्यामुळे शहराच्या कायदा-सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उच्चपदस्थ राजकीय नेत्यांच्या निवासस्थानाची ही अवस्था असेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या चोरट्यांचा तातडीने माग काढण्यासाठी विशेष पथके तयार केली असून, कसून तपास सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम