माजी महापौर नितीन लढ्ढा यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांचा आज भाजपमध्ये प्रवेश

बातमी शेअर करा...

माजी महापौर नितीन लढ्ढा यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांचा आज भाजपमध्ये प्रवेश

जळगाव प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी मिळण्याची आज चिन्हे दिसत आहेत. शहरातील दोन माजी महापौर आणि दिग्गज नगरसेवकांचा एक गट आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती पुढे येत आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जि.एम. फाऊंडेशन भाजप कार्यालयात दुपारी चार वाजता होणाऱ्या या सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी महापौर नितीन लढ्ढा यांच्यासह अनेक नगरसेवक गेल्या काही महिन्यांपासून भाजप प्रवेशाच्या चर्चेत होते. विविध कारणांनी प्रवेश लांबल्याने आज हा प्रवेश होत असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या प्रवेश सोहळ्यात नितीन लढ्ढा यांच्यासह माजी महापौर जयश्री महाजन, माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन, प्रशांत नाईक, आण्णा भापसे, इकबाल पिरजादे, पिंटू सपकाळे, हर्षा अमोल सांगोरे, नवनाथ दारकुंडे,जाकीर पठाण, फिरोज पठाण आदी प्रवेश घेणार आहेत .

सायंकाळी या पक्षप्रवेशानंतर जळगावातील राजकीय समीकरणात मोठे बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या हालचालीमागील खरा राजकीय डाव कोणाचा हे काही तासांत स्पष्ट होणार आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम