“माझे शहर माझी जबाबदारी” उपक्रमांतर्गत जळगाव महानगरपालिकेला स्वच्छता व्यवस्थापनाबाबत निवेदन

बातमी शेअर करा...
“माझे शहर माझी जबाबदारी” उपक्रमांतर्गत जळगाव महानगरपालिकेला स्वच्छता व्यवस्थापनाबाबत निवेदन
जळगाव – “माझे शहर माझी जबाबदारी” या उपक्रमांतर्गत शहरातील नागरिक प्रतिनिधींच्या वतीने आज, ६ नोव्हेंबर रोजी जळगाव शहर महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना शहरातील स्वच्छता व्यवस्थापनाबाबत निवेदन देण्यात आले.
शहरात वाढत चाललेली अस्वच्छता, कचरा संवेदनशील ठिकाणे (GVPs), अनियमित कचरा संकलन, तसेच एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर प्रभावी नियंत्रण न दिसणे या बाबींचा मुद्दा निवेदनात ठळकपणे मांडण्यात आला.
निवेदनात शहरातील कचरा संवेदनशील ठिकाणे ओळखून त्यांचे कायमस्वरूपी उच्चाटन, घरोघरी कचरा संकलनाची निश्चित वेळ, स्त्रोत पातळीवर ओला व सुका कचरा वेगळा करण्याची सक्ती, बाजारपेठांमध्ये रात्री स्वच्छतेची व्यवस्था, प्रत्येक प्रभागात “स्वच्छता दूत” नेमणे आणि प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी अशा दहा ठोस मागण्या करण्यात आल्या.
आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी सकारात्मक भूमिका घेत मागण्या मान्य केल्या असून, निवेदन देणाऱ्यांमधील तीन प्रतिनिधी आणि महापालिकेच्या स्वच्छता विभागासह इतर विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्या समावेशाने एक संयुक्त समिती स्थापन करून शहरातील स्वच्छता व अन्य बाबींवर चर्चा करून ठोस कृती आराखडा तयार केला जाईल, असे सांगितले.
“महापालिका, नागरिक आणि मक्तेदार यांच्या संयुक्त समन्वयातूनच स्वच्छ जळगाव शक्य आहे. योजना चांगल्या आहेत, पण त्यांची शिस्तबद्ध अंमलबजावणी आवश्यक आहे,” असे निवेदनादरम्यान उपस्थित प्रतिनिधींनी नमूद केले.
निवेदन देताना सुहास दुसाने, डॉ. लीना पाटील, प्रा. डॉ. सुधीर भटकर, मंगेश सोनार, विशाल पाटील, सुधाकर दुसाने, भाग्यश्री दुसाने, बी. आर. पाटील, प्राजक्ता चौधरी, संतोष आहुजा, अमित लढ्ढा, डॉ. अमित भंगाळे, डॉ. सुनिल सुर्यवंशी, राजेश सिंधी, शिरीष बडगुजर, सुहास गाजरे, अजिंक्य तोतला, सागर पाटील, हितेश धांडे, महेश जैन, तुषार चौधरी यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम