
माझ्याकडे रागाने का बघतो’ म्हणत तरुणाला मारहाण
माझ्याकडे रागाने का बघतो’ म्हणत तरुणाला मारहाण
जळगाव तालुक्यातील नंदगाव येथील घटना
जळगाव : माझ्याकडे रागाने का बघतोस असे म्हणत शरद ईश्वर धनगर (वय ३५, रा. नंदगाव, ता. जळगाव) यांना रुपेश उर्फ वेदांत पाडुरंग धनगर (येदे) (रा. नंदगाव, ता. जळगाव) यांनी लाकडी दांडक्याने मारहाण करीत जखमी केले. ही घटना दि. ६ रोजी सकाळी ११ रोजी बस स्थानकाजवळ घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील नंदगाव येथे शरद धनगर हे वास्तव्यास असून दि. ६ रोजी सकाळी ११ वाजता
त्याच गावातील रुपेश उर्फ वेदांत धनगर यांनी त्यांना तु माझ्याकडे रागाने बघतो का असे म्हणत त्यांना शिवीगाळ केली. तसेच त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने शरद धनगर याच्या हातावर, खांद्यावर आणि पायावर मारुन गगीर जखमी केले. तसेच पोलिसात तक्रार केल्यास पोलिसांना आणि तुलाही पाहून घेईल तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी देखील दिली. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक अमोल पवार हे करीत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम