मामाच्या घरी आलेल्या तरुणीने घेतला गळफास

पारोळा तालुक्यातील भोंडण येथील घटना

बातमी शेअर करा...

मामाच्या घरी आलेल्या तरुणीने घेतला गळफास

पारोळा टॉलिवूक्यातील भोंडण येथील घटना

पारोळा प्रतिनिधी

तालुक्यातील भोंडण येथे १८ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. पायल संतोष शिंदे (वय १८, रा. पाथर्डी फाटा, नाशिक) असे मृत तरुणीचे नाव आहे.

नाशिक येथील मराठा कॉलेजमध्ये बारावीचे शिक्षण घेत असलेली पायल ही परीक्षेनंतरच्या सुट्टीसाठी आपल्या मामाच्या घरी भोंडण येथे आली होती. २७ मार्च रोजी रात्री जेवणानंतर सर्वजण झोपले. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास पायलने घरातील लोखंडी छताला दोरीच्या साह्याने गळफास घेतला.

पहाटे चारच्या सुमारास लघुशंकेसाठी उठलेल्या मामाने ही घटना पाहताच तातडीने पायलला खाली उतरवून पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

या घटनेबाबत पारोळा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम