मायक्रोमेनिया क्वीजचे टीम एडवर्ड जेनर विजेते

बातमी शेअर करा...

मायक्रोमेनिया क्वीजचे टीम एडवर्ड जेनर विजेते
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा उपक्रम
जळगाव — डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाच्या मायक्रोबायोलॉजी विभागातर्फे मायक्रोमेनिया क्वीजमध्ये टीम एडवर्ड जेनर विजेते ठरले.
या स्पर्धेचे उद्घाटन वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. ल्युईस पाश्चर, रॉबर्ट कोच, एडवर्ड जेनर, जोसेफ लिस्चर, अ‍ॅन्टोनी वॉन ल्युव्हेनव्होक या पाच टीमने सहभाग घेतला. पाच राउंडमध्ये ही स्पर्धा झाली. एका टीम मध्ये पाच विद्यार्थ्यांचा सहभाग होता. एडवर्ड जेनर संघाने ९५ पाँईटसह प्रथम क्रमांक पटकावला, व्दीतीय विजेते ल्युईस पाश्वर तर तृतीय रॉबर्ट कोच विजेते ठरले. वैष्णवी वानखेडे यांनी सुत्रसंचालन तर आभार डॉ. कैलास वाघ यांनी मानले. परिक्षक म्हणून डॉ. प्रशांत गुडेट्टी यांनी काम पाहीले. या स्पर्धेचे समन्वयक म्हणून डॉ. कैलास वाघ, डॉ. भवानी वर्मा यांनी तर गुणलेखक डॉ स्मीता मुंडे, रौनक पटेल यांनी काम पाहिले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम