मालमत्ता कर भरणासाठी सुटीच्या दिवशी दीड वाजेपर्यंत कार्यालय राहणार सुरु
मालमत्ता कर व पाणी पट्टी भरण्याचे मनपाकडून आवाहन
मालमत्ता कर भरणासाठी सुटीच्या दिवशी दीड वाजेपर्यंत कार्यालय राहणार सुरु
मालमत्ता कर व पाणी पट्टी भरण्याचे मनपाकडून आवाहन
जळगाव I प्रतिनिधी
शहरातील नागरिकांना मालमत्ता कर व पाणी पट्टी भरता यावी, याकरीता महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालय सुटीच्या दिवशी देखील दीड वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी मालमत्ता कर व पाणी पट्टी भरून महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या उपायुक्त धनश्री शिंदे यांनी केले आहे.
शहरातील मालमत्ता धारकांकडे २०० कोटी पेक्षा अधिक कर थकीत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना सुखसुविधा पुरवितांना मनपाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. म्हणून नागरिकांनी तातडीने थकीत कर व चालू वर्षाचा कर भरून महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा प्रशासनाच्या वतीने उपायुक्त धनश्री शिंदे यांनी केले आहे. तसेच शनिवार व रविवारी शासकीय सुटी असतांना देखील त्या दिवशी नागरिकांना कर भरता यावा याकरीता शनिवार व रविवार रोजी दुपारी दीड वाजेपर्यंत सर्व प्रभाग कार्यालयांमध्ये भरणा सुरु ठेवण्यात येणार आहे.
आ. सुरेश भोळे यांनी शहरातील नागरिकांसाठी मनपाने अभय योजना जाहीर करावी, असे पत्र दिल्यामुळे मनपा प्रशासनाने अभय योजना जाहीर केली असून त्यामध्ये जानेवारी महिन्यात थकबाकी भरणाऱ्या मालमत्ताधारकांना संपुर्ण शास्ती (दंड) माफ करण्याचे जाहीर केले आहे. तर, फेब्रुवारी महिन्यात थकबाकी भरल्यास ९० टक्के शास्ती (दंड) माफ व मार्च महिन्यात थकबाकी भरल्यास ७५ टक्के शास्ती (दंड) माफ केली जाणार आहे
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम