मालवाहू वाहनाच्या धडकेत तरुण गंभीर जखमी

बातमी शेअर करा...

जळगाव: कानळदा रोडवरील पेट्रोलपंपाजवळ एका मालवाहू वाहनाने दिलेल्या धडकेत अमजद खान अयुब खान पठाण (वय २५) हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला जबर मार लागला असून, त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात २३ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, अमजद खान पठाण हे मूळचे हिंगोली जिल्ह्यातील भगवती गावचे असून, सध्या ते आव्हाणे (ता. जळगाव) येथे वास्तव्याला आहेत. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच १९, सीवाय ११६९) क्रमांकाच्या मालवाहू वाहनाने त्यांना धडक दिली.

या अपघातानंतर धडक देणाऱ्या मालवाहू वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रफुल्ल धांटे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम