
” मास्वे” चे समाजकार्य महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकरिता पुणे येथे धरणे आंदोलन
” मास्वे” चे समाजकार्य महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकरिता पुणे येथे धरणे आंदोलन
पुणे ;- राज्यातील समाजकार्य महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेच्या अनुषंगाने महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स (“मास्वे”) संघटनेतर्फे उच्च शिक्षण संचालनालय, पुणे येथे बुधवार दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी “धरणे आंदोलन” करण्यात येणार आहे. सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ, सेवांतर्गत प्रगती योजना ” कॅस” च्या शासन निर्णयात सुधारणा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यास मंजुरी, एच टी सेवार्थ प्रणालीद्वारे दरमहा वेतन, प्राचार्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे करणे, एनपीएस अंतर्गत रुग्णता उपदान, सेवा निवृत्ती वेतन योजना लागू करणे, सहाय्यक ग्रंथपालांच्या वेतन श्रेणीत सुधारणा, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्र्वासित प्रगती योजना आदी प्रलंबित मागण्यांची, शासनाने आश्वासन देऊनही पूर्तता न केल्यामुळे “मास्वे” ने धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून याबाबत ची नोटीस अपर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई आणि संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य,पुणे यांना ४ सप्टेंबर च्या पत्रान्वये देण्यात आली असून ही बाब राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांतदादा पाटील यांना कळविण्यात आली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम