
माहिती अधिकार सप्ताहानिमित्त ९ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चासत्र
माहिती अधिकार सप्ताहानिमित्त ९ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चासत्र
जळगाव : प्रतिनिधी
माहिती अधिकार सप्ताह ५ ते १२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत जिल्ह्यात साजरा केला जात आहे. या निमित्त ९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे माहिती अधिकार कायदा २००५ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
चर्चासत्रात राज्य माहिती आयुक्त श्री. भूपेंद्र गुरव अध्यक्षस्थानी असतील आणि राज्य माहिती आयोग खंडपीठ, नाशिक यांचेही प्रतिनिधी सहभागी होतील. जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील जन माहिती अधिकारी, प्रथम अपीलीय अधिकारी, सामान्य नागरिक व माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी या चर्चासत्रास उपस्थित राहावे, असे आवाहन जळगावच्या निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम