
माहेरून सोन्याचे दागिने, स्कुटी आणि पैसे मागणीसाठी विवाहितेचा छळ
माहेरून सोन्याचे दागिने, स्कुटी आणि पैसे मागणीसाठी विवाहितेचा छळ
जळगाव (प्रतिनिधी):
माहेरून सोन्याची चैन, स्कुटी आणि रोख रक्कम आणण्यासाठी विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. हर्षदा प्रेमल वाल्हे (वय २८, रा. निवृत्तीनगर, गुजराल पेट्रोलपंपामागे) या विवाहितेला दि. २५ जानेवारी ते १४ एप्रिल या कालावधीत सासरच्यांनी त्रास दिला.
माहेरून अपेक्षित गोष्टी आणण्यासाठी सतत तगादा लावला जात असल्याने त्रस्त झालेल्या हर्षदा यांनी शेवटी माहेरी आश्रय घेतला. त्यांनी ८ जुलै रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पतीसह सासरच्या इतर सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार संजीव मोरे करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम