मा.आमदार डॉ.सुधीर तांबे यांचा जळगाव जिल्हा दौरा: भडगाव भेटीत युवकांमध्ये सामाजिक चेतनेची नवी ऊर्जा

बातमी शेअर करा...

मा.आमदार डॉ.सुधीर तांबे यांचा जळगाव जिल्हा दौरा: भडगाव भेटीत युवकांमध्ये सामाजिक चेतनेची नवी ऊर्जा

भडगांव (प्रतिनिधी):नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार व जयहिंद लोकचळवळ चे संस्थापक डॉ. सुधीर जी तांबे यांनी नुकताच जळगांव जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी भडगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून लोकचळवळीच्या पुढील दिशा व ध्येयांवर चर्चा केली. कार्यक्रमात समाजहिताच्या विविध विषयांवर मार्गदर्शन करताना डॉ. तांबे म्हणाले की, “जयहिंद लोकचळवळ ही एक राजकीय संघटना नसून, ती सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे. युवक, शेतकरी, महिला आणि वंचित घटकांसाठी ही चळवळ काम करत आहे. लोकसहभागातूनच परिवर्तन शक्य आहे.”

या कार्यक्रमाला भडगाव तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास शेतकी संघाचे चेअरमन भैय्यासाहेब पाटील, युवा नेते भुषण अविनाश पवार, मा.नगरसेविका योजनाताई पाटील,डी.डी.पाटील सर,ॲड.अंबादास गोसावी, पत्रकार सागर महाजन, विवेक पवार,तुषार देशमुख, अशोक देशमुख,वी आर महाजन सर, पप्पू देशमुख, ललित धनगर, उमेश भोई, मयूर भोई, शुभम बागुल,जयहिंद लोकचळवळ भडगाव समन्वयक अशुतोषकुमार पाटील, राज पवार, कुणाल निकम,चेतन सोनवणे कार्यक्रमाच्या शेवटी कार्यकर्त्यांनी भविष्यातील सामाजिक प्रबोधन, युवक सहभाग, आणि ग्रामीण विकास यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम