
मित्रांच्या भांडणावरुन घरी जाणाऱ्या तरुणावर धारदार शस्त्राने वार
मित्रांच्या भांडणावरुन घरी जाणाऱ्या तरुणावर धारदार शस्त्राने वार
जळगाव : मित्रांमधील भांडणाच्या कारणावरुन घरी जात असलेल्या रविंद्र विक्रम हटकर (वय ३५, रा. गवळीवाडा, तांबापुरा) यांना धारदार वस्तूने मारहाण करुन जखमी केले. ही घटना दि. २५ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास हनुमान मंदिराजवळ घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील तांबापुरा परिसरातील गवळीवाडा परिसरात रविंद्र हटकर हे वास्तव्यास असून ते मजूरी करतात. दि. २५ रोजी दुपारच्या सुमारास ते हनुमान मंदिराजवळील रस्त्यावरुन जात होते. यावेळी आकाश प्रकाश चव्हाण यांचे दि. २४ रोजी रविंद्र हटकर याचा मित्र दीपक हटकर यांचे भांडण झाले होते. त्या कारणावरुन संशयित आकाश चव्हाण याने काहीतरी धारदार वस्तूने रविंद्र हटकर याच्या डोक्यात वार केले. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. याप्रकरणी संशयित आकाश प्रकाश चव्हाण (रा. तांबापुरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ सचिन पाटील हे करीत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम