मुंबई-वाराणसी दरम्यान १२ विशेष रेल्वे गाड्या धावणार

बातमी शेअर करा...

मुंबई-वाराणसी दरम्यान १२ विशेष रेल्वे गाड्या धावणार

मुंबई प्रतिनिधी छठ पूजा आणि दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या वाढत्या संख्येला सामावून घेण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते वाराणसी या मार्गावर १२ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबई ते उत्तर भारत प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, विशेष गाडी क्र. ०४२२५ ही १४ ऑक्टोबर २०२५ ते १८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दर मंगळवारी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सायंकाळी ४:५५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे २:०५ वाजता वाराणसी येथे पोहोचेल. तसेच, विशेष गाडी क्र. ०४२२६ ही १३ ऑक्टोबर २०२५ ते १७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दर सोमवारी वाराणसी येथून पहाटे १:३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २:२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. या गाड्यांना ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापति (भोपाळ), बीना, वीरांगणा लक्ष्मीबाई झांसी, ओराई, कानपूर, लखनौ, सुलतानपूर आणि जौनपूर सिटी यांसारख्या प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. यामुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील प्रवाशांना प्रवास सुलभ होईल.

या गाड्यांमध्ये ४ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ९ वातानुकूलित तृतीय श्रेणी आणि २ जनरेटर कार यांचा समावेश आहे, ज्यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल.गाडी क्र. ०४२२५ साठी तिकीट आरक्षण १२ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होईल. तिकिटे IRCTC च्या अधिकृत संकेतस्थळावर (www.irctc.co.in) आणि सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर उपलब्ध असतील. प्रवाशांनी वेळापत्रक आणि थांब्यांची माहिती www.enquiry.indianrail.gov.in किंवा NTES अ‍ॅपवर तपासावी, असे रेल्वे प्रशासनाने सुचवले आहे.मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी हे प्रसिद्धीपत्रक जारी केले असून, प्रवाशांना या विशेष गाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम