मुकुंद नगरातील घरफोडी प्रकरणाचा छडा, दोघे अटकेत; ६१ हजारांचा चांदीचा ऐवज हस्तगत

बातमी शेअर करा...

मुकुंद नगरातील घरफोडी प्रकरणाचा छडा, दोघे अटकेत; ६१ हजारांचा चांदीचा ऐवज हस्तगत

जळगाव – पुण्याला मुलाकडे गेलेल्या नागरिकाच्या बंद घराचे दरवाजे व खिडक्यांचे ग्रील वाकवून चोरट्यांनी देवघरातील चांदीचे मुकुट, मूर्ती व अन्य साहित्य असा सुमारे ६१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेचा तपास करत एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत दोघा चोरट्यांना अटक करून चोरलेला सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.

मुकुंद नगर येथील लाठी शाळेच्या मागे राहणारे अरुण लक्ष्मण शेटे (वय ६४) हे दि. २७ जून रोजी पुण्याला मुलाकडे गेले होते. ११ जुलै रोजी ते जळगावला परत येत असताना शेजाऱ्यांकडून त्यांच्या घराची खिडकी आणि दरवाजा उघडलेले असल्याची माहिती मिळाली. घरी परतल्यानंतर त्यांनी घराची पाहणी केली असता फर्निचरच्या कपाटात ठेवलेले महादेवाच्या पिंडीवरील चांदीचे मुकुट, देवघरातील चांदीच्या मूर्ती आणि अन्य साहित्य चोरीला गेले असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने सुरू केला. या पथकात उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, सहाय्यक फौजदार प्रदीप चौधरी, गिरीश पाटील, रतन गिते, गणेश ठाकरे, नितीन ठाकूर आणि राहुल घेटे यांचा समावेश होता. पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता दोन संशयित व्यक्ती कैद झाल्या. त्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे शाकीब ताजुद्दीन शेख (वय २४, रा. कासमवाडी) आणि राहुल रावळकर शेख (वय ३२, रा. जाखनीनगर) या दोघांना ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत दोघांनी चोरीची कबुली दिली असून, त्यांच्या ताब्यातून महादेवाच्या पिंडीवरील चांदीचे मुकुट, चांदीच्या मूर्ती आणि अन्य साहित्य असा एकूण ६१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम