
मुक्ताईनगरमध्ये मुलींच्या छेडछाडीप्रकरणी फरार आरोपींना तातडीने अटक करा
शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
मुक्ताईनगरमध्ये मुलींच्या छेडछाडीप्रकरणी फरार आरोपींना तातडीने अटक करा
शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
जळगाव (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर येथे घडलेल्या मुलींच्या छेडछाडीच्या प्रकारात दोषी आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात उपजिल्हा प्रमुख प्रा. भाऊ साहेब सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
शहरात घडलेल्या या गंभीर घटनेने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना असून, आरोपी अजूनही फरार असल्याने लोकांमध्ये अस्वस्थता आहे. पोलिसांनी तातडीने कार्यवाही करून आरोपींना अटक करावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जर लवकरात लवकर आरोपींना अटक झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे. यावेळी प्रा. आऊसाहेब सोनवणे, प्रमोद अगे, सचिन चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या घटनेमुळे मुक्ताईनगरमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांकडून लवकरात लवकर ठोस कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम