मुक्ताईनगरात एकाच रात्रीत चार घरफोड्या

बातमी शेअर करा...

मुक्ताईनगरात एकाच रात्रीत चार घरफोड्या
मुक्ताईनगर : शहरातील गोदावरीनगर परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एका रात्रीत तब्बल चार घरे फोडून रोख रक्कम आणि दागिने असा लाखोंचा मुद्देमाल लंपास केला असून, एका घरात चोरीचा प्रयत्न मात्र अपयशी ठरला. या सलग घरफोड्यांमुळे परिसरातील नागरिक चांगलेच धास्तावले आहेत.

येथील शुभम पुरुषोत्तम कलंत्री यांच्या घरात २८ रोजी सकाळी लाकडी कपाट उघडे आढळले. तपासात टेबलच्या ड्रॉवरमधून ३२ हजार रुपये चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. मनोहर अशोक कुलकर्णी यांच्या घरात चोरट्यांनी खिडकीचे ग्रील कापून प्रवेश केला. त्यांनी ९ हजार ५०० रुपये रोख आणि महिलेच्या पर्समधील ७ हजार रुपये असा एकूण १६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. तर सुजीत पंढरीनाथ पाटील यांच्या घरातही चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला.

मात्र, तो निष्फळ ठरला. तसेच, आदर्श इंग्लिश मीडियम शाळेजवळील परेश मधुकर चौधरी यांच्या घरातून सोन्या, चांदीचे दागिने आणि रोख असा तब्बल २ लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. परेश चौधरी यांच्या तक्रारीनुसार सोन्याचेमंगळसूत्र, अंगठ्या, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीस गेली आहे. या सर्व प्रकरणाचा तपास पो.नि. आशिषकुमार अडसूळ यांच्या मार्गदर्शनात पो.हे.कॉ. महिंद्र सुरवाडे करत असून, फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळी तपासणी करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम