
मुक्ताईनगरात बेकायदेशीर विमल गुटखा तस्करी; आरोग्यावर गंभीर धोका
मुक्ताईनगर : शहरातील बेकायदेशीर विमल गुटख्याची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असून, विशेषतः शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, कामगार व इतर नागरिक यांचे आरोग्य धोक्यात आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोगासारख्या घातक आजारांचे प्रमाण वाढत आहे आणि अनेक नागरिक गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत.
स्थानिक सूत्रांनुसार, दररोज सकाळी व रात्री मध्य प्रदेशातून विमल गुटख्याने भरलेली वाहने महाराष्ट्रात येत आहेत. ही वाहने जळगाव, भुसावळ, यावल, मलकापूर, अकोला, जामनेर आणि संभाजीनगर परिसरात पाठवली जात असल्याची माहिती आहे.
सामाजिक संताप वाढला असून, नागरिकांचा आरोप आहे की स्थानिक पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन या तस्करीकडे दुर्लक्ष करत आहेत. तसेच, काही अधिकारी आणि कर्मचारी विक्रेत्यांशी संगनमत करत असल्याची चर्चा आहे. यामुळे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना गुटखा सहज उपलब्ध होत असून, तरुण पिढी याच्या व्यसनाला बळी पडत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम