मुक्ताईनगरात संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे भव्य स्वागत

बातमी शेअर करा...

मुक्ताईनगरात संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे भव्य स्वागत

मुक्ताईनगर: श्री संत मुक्ताई अंतर्धान समाधीस्थळ श्रीक्षेत्र कोथळी येथून आषाढी वारीसाठी पंढरपूरला गेलेल्या आई साहेबांच्या पालखीचे बुधवारी (३० जुलै २०२५) स्वस्थळी उत्साहात आगमन झाले. यानिमित्ताने पालखी सोहळा उत्सव समिती व पंचक्रोशीतील नागरिकांच्या सहभागाने भव्य वारकरी सांप्रदायिक दिंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

स्पर्धेत १०२ भजनी मंडळांनी सहभाग घेत टाळ, मृदंग आणि हरिनामाच्या गजराने मुक्ताईनगरीला भक्तिमय केले. नवीन मुक्ताई मंदिरापासून सकाळी १० वाजता सुरू झालेली दिंडी बस स्टॅन्ड, परिवर्तन चौक, गजानन महाराज मंदिर मार्गे जुने मंदिर, श्रीक्षेत्र कोथळी येथे समारोप झाली. शेकडो वर्षांची परंपरा जोपासणाऱ्या या सोहळ्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले.

स्पर्धेचे बक्षीस वितरण हरिभक्त परायण रविंद्र हरणे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर ॲड. रवींद्र पाटील, माजी आमदार अरुण पाटील, विशाल महाराज खोले, सम्राट पाटील यांच्या हस्ते झाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम