मुक्ताईनगर तालुक्यातील आशा वर्करांचा आवाज बुलंद; कोरोना काळातील राहिलेला मोबदला तात्काळ देण्याची मागणी

बातमी शेअर करा...

मुक्ताईनगर तालुक्यातील आशा वर्करांचा आवाज बुलंद; कोरोना काळातील राहिलेला मोबदला तात्काळ देण्याची मागणी

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून सेवा बजावलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील आशा वर्करांनी त्यांच्या राहिलेल्या विशेष मानधनाबाबत प्रशासनाकडे पुन्हा एकदा जोरदार आवाज उठवला आहे. शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार अद्याप मोबदला न मिळाल्याने आशा वर्करांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देत तातडीने मानधन मंजूर करण्याची मागणी केली आहे.

आशा वर्करांनी निवेदनात नमूद केले आहे की, कोविड काळात सर्वेक्षण, संपर्क शोध मोहीम, लसीकरण तसेच नागरिकांना आवश्यक आरोग्य सेवा देताना त्यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा केली नाही. गावागावांत, घराघरांत जाऊन काम करत असताना अनेकांनी संसर्गाचा धोका पत्करला. परंतु शासनाने ज्या विशेष भत्त्याचे व मानधनाचे आश्वासन दिले होते, त्याची प्रत्यक्षात पूर्तता झालेली नसल्याने त्यांच्यात तीव्र नाराजी आहे.

पंधरा दिवसांत उर्वरित मोबदला न दिल्यास गटविकास अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आशा वर्करांनी दिला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम