
मुक्ताईनगर तालुक्यातील रुईखेडा येथील मदरशातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल मौलाना अबुजर यांचा गावकऱ्यांकडून उमऱ्याचा सन्मान
मुक्ताईनगर तालुक्यातील रुईखेडा येथील मदरशातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल मौलाना अबुजर यांचा गावकऱ्यांकडून उमऱ्याचा सन्मान
मुक्ताईनगर(प्रतिनिधी)रुईखेडा तालुका मुक्ताईनगर येथील जामा मस्जिद मदरशात उल्लेखनीय शैक्षणिक व धार्मिक कामगिरी करत गावातील युवक व विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारे मौलाना हाफिज अबुजर यांचा आज गावकऱ्यांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या समर्पित सेवेला दखल देत ग्रामस्थांनी त्यांना उमऱ्याच्या पवित्र यात्रेसाठी प्रायोजित करण्याचा निर्णय घेतला.गेल्या 10 वर्षांपासून मौलाना यांनी मदरशामध्ये विद्यार्थ्यांच्या कुरआनी शिक्षणात सुधारणा हाफिज कुराण विषयाचे सखोल मार्गदर्शन केले व शिस्त, नैतिक मूल्ये व सामाजिक जबाबदारीवर भर दिले,विद्यार्थ्यांसाठी मदत व शैक्षणिक सुविधा,तसेच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन अशा महत्त्वपूर्ण उपक्रमांद्वारे मौलांनी कामगिरी बजावली आहे.मौलाना यांच्या या अथक सेवेमुळे मदरशाची शैक्षणिक पातळी लक्षणीयरीत्या उंचावली असून गावातील पालक व नागरिक त्यांच्याबद्दल समाधान व्यक्त करत आहेत.गावकऱ्यांनी सांगितले की, “मौलाना अबुजर यांनी जी सेवा आणि परिश्रम घेतले आहेत त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही उमऱ्याचा खर्च गावकऱ्यांच्या मदतीतून उचलला आहे. हा त्यांच्या कार्याचा मान आहे.”सन्मान स्वीकारताना मौलाना म्हणाले, “गावकऱ्यांनी दाखवलेला विश्वास आणि सन्मान माझ्यासाठी मोठी प्रेरणा आहे. मी पुढेही विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या सेवेसाठी कार्यरत राहीन. या निमित्ताने मनियार बिरादरीचे जिल्हा उपाध्यक्ष हकीम चौधरी, अहमद ठेकेदार यांनी हाफिज अबुजर यांचे सत्कार कारण्यत आले या वेळी जामा मस्जिद चे मुतवाली मोहम्मद दलील,मोहम्मद शकील मुलतानी, गुलजार कालू, नवाज खाँ लाल खाँ, सिराज शाह, हाफिज शाहरुख, हाफिज दिलदार, सिराज भाई, सलीम दलील, हाफिज जावेद आदी उपस्थित होते,सदर कार्यक्रमात रुईखेडा येथील गावातील सर्व समाज बांधव उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम