मुक्ताईनगर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी

बातमी शेअर करा...

मुक्ताईनगर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी

मुक्ताईनगर | तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टर एक लाख रुपये सानुग्रह अनुदान देऊन ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे.

विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यात केळी, कापूस, सोयाबीन, मका यांसह विविध पिके अतिवृष्टीमुळे जमीनदोस्त झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. ढगफुटी, वादळी वारे, विजेचा लपंडाव, खतांची टंचाई आणि महागाईमुळे आधीच त्रस्त असलेला शेतकरी कर्जबाजारी होत चालल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.

पावसामुळे पिके वाहून गेल्याने किंवा सडल्याने फवारणीसाठी औषध खरेदी करण्यास शेतकऱ्यांकडे पैसा नाही. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या हक्काचा विचार करून ओला दुष्काळ घोषित करून तात्काळ आर्थिक मदत करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.

ही मागणी प्रदेश सचिव अनिल वाडीले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या निवेदनावर एड. अरविंद गोसावी, संजय चौधरी पाटील, प्रा. सुभाष पाटील, शेख भैय्या शेख करीम, बी.डी. गवई, संजय पाटील यांच्या सह्या आहेत. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम