मुक्ताईनगर तालुक्यात केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांच्याहस्ते जलसंधारण कामांचा शुभारंभ

जिल्ह्यातील जलसिंचनाचे प्रस्ताव पाठविण्याचे जलशक्ती मंत्र्यांचे आवाहन

बातमी शेअर करा...

मुक्ताई नगर तालुक्यात केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांच्याहस्ते जलसंधारण कामांचा शुभारंभ

जिल्ह्यातील जलसिंचनाचे प्रस्ताव पाठविण्याचे जलशक्ती मंत्र्यांचे आवाहन

मुक्ताईनगर प्रतिनिधी

मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्री अकाराऊत येथे आज केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांच्या उपस्थितीत जलसंधारण कामांचे विधीवत पूजन करून प्रारंभ करण्यात आला. मान्यवरांसह यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

या उपक्रमाच्या अंतर्गत परिसरातील नाल्यांचे खोलीकरण करून यात जलसंचय करण्यात येणार आहे. याचा परिसरातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील पिंप्री अकराउत या गावी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांचा जलसंधारण कामाच्या संदर्भात दौरा नियोजित होता. यावेळी त्यांनी पिंपरी अकराउत या गावात येऊन जलसंधारण कामांचे पूजन करून कामास प्रारंभ करून अभियानाचा शुभारंभ केला.
यानंतर गावातील आयोजित जल अभियान शुभारंभ कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली.

यावेळी कार्यक्रमाला केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांचे समवेत केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे, जळगाव लोकसभेच्या खा स्मिता वाघ, रावेर विधानसभेचे आ अमोल जावळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, के जी रावसाहेब, डॉ राजेंद्र फडके, नंदकिशोर महाजन, प्रफुल्ल जवरे व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गावकरी मंडळी यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांचा लाकडी बैलगाडीची भेट वस्तू देऊन सत्कार केला. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे व आमदार अमोल जावळे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना जलशक्ती मंत्री सी आर पाटील म्हणाले की, पिंप्री अकराउत गाव हि माझी जन्मभूमी आहे तसेच जिल्ह्यातील जलसिंचनाचे प्रस्ताव लोकप्रतिनिधींनी माझ्याकडे आणावे ते मी मंजूर करणार असेही सांगितले.

तसेच गावातील नाल्यांचे खोलीकरण करून जलसंचय करण्यात येणार असून, पाझर तलावाचे देखील नूतनीकरण करण्यात येणार आहे. हे काम सी एस आर निधीतून करणार असून या कामाला सुमारे 12 कोटी रुपयांपर्यंत खर्च लागणार असून, दोन 50X50 च्या दोन मोठ्या विहिरी तयार करून त्या ठिकाणी पाण्याचा संचय करण्यात येणार आहे. जल दिवस 22 मार्चला असून त्यादिवशी या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. तीन लाख करोड सिंचनाच्या प्रकल्पासाठी बजेटमध्ये केंद्राने दिले आहे. जनतेने धनसंचय करण्यापेक्षा जलसंचय केले पाहिजे ते येणाऱ्या पिढीसाठी गरजेचे आहे. असेही ते बोलताना यावेळी म्हणाले. कार्यक्रमाला गावकरी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम