मुक्ताईनगर न्यायालयात कायदेजनजागृती शिबिर संपन्न

बातमी शेअर करा...

मुक्ताईनगर न्यायालयात कायदेजनजागृती शिबिर संपन्न

ज्येष्ठ नागरिकांचे हक्क, पालक पालनपोषण कायदा आणि मध्यस्थी प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन

मुक्ताईनगर – राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने मुक्ताईनगर न्यायालयात २५ नोव्हेंबर रोजी कायदेविषयक जनजागृती शिबिर पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश बी. जी. पवार यांनी भूषवले. प्रमुख वक्ते म्हणून ॲड. संतोष टी. कोळी आणि ॲड. देवेंद्र बोदडे यांनी सहभाग घेतला.

शिबिराला उपस्थित कायदेविषयक अधिकारी, वकील संघाचे सदस्य, न्यायालयीन कर्मचारी आणि मोठ्या संख्येने पक्षकार उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश बी. जी. पवार यांनी १३ डिसेंबर रोजी होणाऱ्या लोकअदालतीत अधिकाधिक प्रकरणे मध्यस्थीद्वारे निकाली निघावीत, असे आवाहन केले.

प्रमुख वक्ते ॲड. संतोष टी. कोळी यांनी पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचे पालणपोषण व कल्याण कायदा 2007 या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. “आयुष्याच्या सांजवेळी मनातील उमेद आणि खिशातील पैसा कमी होत असताना गरज असते एका आधाराची”, असे सांगत त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या मुलांकडून होणाऱ्या दुर्लक्षाच्या परिस्थितीत कायदा कोणत्या प्रकारे संरक्षण देतो याची उदाहरणांसह माहिती दिली.

दुसरे प्रमुख वक्ते ॲड. देवेंद्र बोदडे यांनी मध्यस्थी प्रक्रिया व तिचे फायदे याबाबत सखोल मार्गदर्शन करत, न्यायालयीन तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थी हा प्रभावी मार्ग असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ॲड. अशोक बोदडे यांनी केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम