
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाचा प्रतिसाद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाचा प्रतिसाद
सेवा का अभियानांतर्गत १५० हून अधिक रूग्णांची आरोग्य तपासणी ; पहिल्याच दिवशी ३८ जणांची नोंदणी
जळगाव – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाला समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाने प्रतिसाद देत सेवा का अभियान या अतंर्गत २२ ते २४ जुलै या तीन दिवशी मोफत शस्त्रक्रियांचे आयोजन केले आहे. पहिल्याच दिवशी या अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून ३८ जणांची शस्त्रक्रियेसाठी नोंदणी करण्यात आली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस मंगळवारी विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानुसार डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातर्फे तीन दिवस सेवा का अभियान म्हणून राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शासकीय योजनेत न बसणार्या सर्व शस्त्रक्रिया मोतिबिंदू, सिझेरीयन,संतती,जनरल शस्त्रक्रिया मोफत केल्या जात आहे.तसेच एन्जीओग्राफीसह विविध आजारावर अल्पदरात शस्त्रक्रिया व उपचार दिले जाणार असून एमआरआय,सीटी स्कॅन,सोनोग्राफीसह पॅथालॉजीकल चाचण्या देखिल अत्यल्प दरात केल्या जात आहे. अभियानाच्या पहिल्याच दिवशी १५० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.त्यापैकी ३८ जणांची शस्त्रक्रियेसाठी नोंदणी करण्यात आली असून तज्ज्ञ डॉक्टरांकडून या रूग्णांवर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत व अत्यल्प दरात केल्या जाणार आहेत. यात जनरल सर्जरी, हृदयविकार, कान-नाक-घसा, स्त्रीरोग, नेत्ररोग यासारख्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे. हे अभियान दि. २४ जुलैपर्यंत सुरू राहणार असून गरजू रूग्णांनी त्वरीत नावनोंदणी करून अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातर्फे करण्यात आले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम