मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना : जळगाव परिमंडलात ११ प्रकल्प कार्यान्वित, १३,५०० शेतकऱ्यांना लाभ

बातमी शेअर करा...

मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना : जळगाव परिमंडलात ११ प्रकल्प कार्यान्वित, १३,५०० शेतकऱ्यांना लाभ

जळगाव : कृषीपंप धारक शेतकऱ्यांना दिवसा अखंड वीज पुरवठा करण्यासाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत जळगाव परिमंडलात ११ सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. या प्रकल्पांमधून ५४ मेगावॅट सौरऊर्जा निर्माण होत असून सुमारे १३,५०० शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे.

नोव्हेंबर २०२४ ते मार्च २०२५ दरम्यान वावडे, लासगाव, वेल्हाळे, सांगवी, कुंडे बुद्रुक, सावखेडा होळ, विटनेर, बहादरपूर आणि चांदसर या गावांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात आले. यामध्ये वेल्हाळे (८ मेगावॅट), सावखेडा होळ (९ मेगावॅट) व बहादरपूर (६ मेगावॅट) हे मोठे प्रकल्प आहेत.

महावितरणच्या मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली उर्वरित प्रकल्पांचीही कामे प्रगतीपथावर असून, शेतकऱ्यांना दिवसा स्थिर वीज पुरवठा देण्याचा शासनाचा प्रयत्न अधिक गतिमान झाला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम