मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात चोपडा विधानसभा मतदार संघात 61 कोटीची कामे मंजूर !

आ. सौ. लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नांना यश

बातमी शेअर करा...

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात चोपडा विधानसभा मतदार संघात 61 कोटीची कामे मंजूर !

आ. सौ. लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नांना यश

ग्रामीण भागातील 40 किमीचे रस्त्यांचा होणार कायापालट : आ. लताताई सोनवणे यांचा पाठपुरावा

चोपडा l प्रतिनिधी 

चोपडा तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा पहिला व दुसरा टप्पा यशस्वी झाला असून, तिसऱ्या टप्प्यालाही मान्यता मिळालेली आहे.

आ. सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी कार्यसम्राट आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या पाठपुराव्यामुळे चोपडा मतदार संघात 40.520 किमीच्या रस्त्यांसाठी 56 कोटी 70 लक्ष

व देखभाल दुरुस्तीसाठी 3 कोटी 75 लक्ष असा एकूण सुमारे 61 कोटी 45 लक्ष एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे चोपडा व यावल तालुक्यातील रस्त्यांचा

मुख्यमंत्री

काया पालट होणार असल्याने शेतकरी व ग्रामस्थांनी आ. सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना धन्यवाद दिले आहे.

आ. सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,

ग्राम विकास मंत्री गिरीष महाजन, जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच मदत व पुनर्वसन मंत्री अनिलदादा पाटील यांचे आभार मानले आहेत

मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मंजूर कामे

१) गोरगावले बु. ते धनवाडी रस्ता ( 2.805 कि. मी – 4 कोटी 13 लक्ष )
२) मंगरूळ ते गोरगावले खू. रस्ता ( 1.900 कि.मी -2 कोटी 89 लक्ष )
३) तावसे बु.- मजरेहोळ ते रामा -11रस्ता ( 6.840 कि.मी- 9 कोटी 44 लक्ष )
४) देवगाव ते पुनगाव ( 4.620 कि. मी 8 कोटी 36 लक्ष )
५) चोपडा ते चहार्डी रस्ता (5.375 कि.मी – 8 कोटी 9 लक्ष)
६) प्रजिमा 05- चुंचाळे ते कर्जाने रस्ता ( 7.500 कि.मी -11 कोटी 79 लक्ष )
७) धानोरा ते मोहरद रस्ता ( 3.710 कि.मी – 3 कोटी 29 लक्ष )
८) दहीगाव ते मोहराळा रस्ता ( 2.940 कि.मी – 3 कोटी 39 लक्ष )
९) विरावली ते वढोदे रस्ता ( 2.810 कि.मी -2 कोटी 33 लक्ष )
१०) मनवेल ते पिळोदे खु. रस्ता ( 2.020 कि.मी – 2 कोटी 95 लक्ष ) असा एकूण 61 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.

चोपडा विधान सभा मतदार संघात 10 रस्त्यांच्या 40.520 कि.मी रस्त्यांसाठी 56 कोटी 70 लक्ष 92 हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

तर देखभाल दुरुस्तीसाठी 3 कोटी 75 लक्ष 1 हजार असे एकूण सुमारे 61 कोटी 45 लक्ष एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

यामुळे चोपडा व यावल तालुक्याच्या रस्त्यांचा कायापालट होणार असल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

आ. सौ. लताताई सोनवणे व माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,

ग्राम विकास मंत्री गिरीष महाजन, जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचे आभार मानले आहेत.

हे ही वाचा👇

माजी कार्यसम्राट आमदार अण्णासो प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचा उपस्थितीत चहार्डी येथील श्रीराम सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

अजून वाचा👇

विष्णापुर येथे 14. 5 कोटीच्या आदिवासी वसतीगृहाचे लोकार्पण

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम