
मुर्शिदाबाद व नीमच घटनांचा वक्फ बचाव समितीतर्फे तीव्र निषेध
मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाख भरपाई व सरकारी नोकरीची मागणी
मुर्शिदाबाद व नीमच घटनांचा वक्फ बचाव समितीतर्फे तीव्र निषेध
मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाख भरपाई व सरकारी नोकरीची मागणी
जळगाव – पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे वक्फ विरोधी आंदोलनादरम्यान पोलिस गोळीबारात तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना तसेच मध्य प्रदेशातील नीमच येथे जैन धर्मगुरूंवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्ड, दिल्लीशी संलग्न वक्फ बचाव समिती, जळगावच्या वतीने करण्यात आला.
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन
या दोन्ही दुर्दैवी घटनांच्या पार्श्वभूमीवर समितीने महामहिम राष्ट्रपतींना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवेदन सादर केले. यात मुर्शिदाबाद येथे मृत्यू पावलेल्या तिन्ही तरुणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ₹२५ लाखांची नुकसानभरपाई, त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी, तसेच दोन्ही घटनांची एसआयटीमार्फत (विशेष तपास पथक) चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांच्याकडे मुफ्ती खालीद आणि मुफ्ती रमिज यांच्या हस्ते सादर करण्यात आले.
निवेदनप्रसंगी समितीचे सदस्य उपस्थित
या वेळी समितीचे प्रमुख सदस्य व पदाधिकारी – मुफ्ती खालीद, मुफ्ती रमिज, मौलाना उमेर, मौलाना रहीम पटेल, मौलाना वसीम पटेल, मौलाना कासिम, फारूक, मौलाना साजिद, फारुख शेख, मतीन पटेल, अनिस शहा, मजहर पठाण, अन्वर खान, रिजवान बागवान, इमरान शेख, नजमोद्दीन शेख, शेख फारूक लुकमान आदी उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम